हवेली तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:19 AM2021-03-13T04:19:58+5:302021-03-13T04:19:58+5:30
तहसील कार्यालयात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आढळून येत आहे. हवेली तहसील कार्यालयाच्या इमारतीलगतच नगर भूमापन अधिकारी कार्यालय, सह दुय्यम ...
तहसील कार्यालयात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आढळून येत आहे. हवेली तहसील कार्यालयाच्या इमारतीलगतच नगर भूमापन अधिकारी कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय व पुणे शहर तहसील कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या लक्षात घेता प्रशासन करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबतचे प्रयत्न येथे तोकडे पडत असल्याचे जाणवत आहे.
हवेली तहसील कार्यालयात नागरिक खातेदार शेतकऱ्यांची कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. तालुक्यातील सर्वच भागातील नागरिक आपापल्या कामानिमित्त तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष, पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, वतन, फौजदारी, जमीन,गौणखनिज, एन ए, आरटीएस, आवक-जावक टेबल या ठिकाणी येऊन आपल्या प्रकरणाची चौकशी करून पाठपुरावा करत असतात. मात्र बहुतांशी नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्वांनी मास्क वापरावे, हात वारंवार सॅनिटाईजरने धुवावेत, सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे व विनाकारण कोणीही गर्दी करू नये.
संजय भोसले (महसूल नायब तहसीलदार)