पाटसला सख्ख्या तीन भावांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:21+5:302021-03-01T04:11:21+5:30
गेल्या पंधरवाड्यात एकाच कुटुंबातील अकरा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. या कुटुंबातीलच शेजारी शेजारी राहणाऱ्या तीन भावांचा मृत्यू झाला. ...
गेल्या पंधरवाड्यात एकाच कुटुंबातील अकरा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. या कुटुंबातीलच शेजारी शेजारी राहणाऱ्या तीन भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. १९) ६८ वयाचा भाऊ, रविवारी (दि. २१) ७० वयाचा भाऊ तर गुरुवारी (दि. २५) ६६ वयाचा तिसऱ्या भावाचे पाठोपाठ निधन झाले. तसेच याच कुटुंबातील उर्वरित आठ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. पाटस येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित वाढत आहे. पाटस येथे शनिवारपर्यंत पाच रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आरोग्यसेवक भीमराव बढे यांनी सांगितले. आरोग्य विभागातर्फे रोज नित्यनियमाने घरोघरी जाऊन कोरोनाबाबत दक्षता घेण्याविषयी माहिती दिली जात आहे. गावात धुराळणी फवारणी करण्याबाबत ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य सेवक भीमराव बढे, आरोग्य सेविका नीता वणवे यांनी आशा स्वयंसेविकांना कोरोनाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. कारण आशा स्वयंसेविका वाड्या-वस्त्यांवर जाऊन कोरोनासंदर्भात दक्षतेविषयी माहिती देत आहे.
फोटो ओळ : पाटस येथे आशा स्वायंसेविकांना कोरोनासंदर्भात माहिती देतांना आरोग्यसेवक भीमराव बढे, आरोग्यसेविका नीता वणवे.