Corona Update: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक; एकाच दिवसात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:32 PM2022-01-18T20:32:21+5:302022-01-18T20:35:04+5:30
आज पुणे शहरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे...
पुणे: Pune Corona Update: शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. पुण्यात आज ६ हजार ३२० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात ४ हजार ८६६ तसेच जुन्या सॅम्पल्समधील १ हजार ४५४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. काल पुण्यातील एका दिवसातील रुग्णवाढ ४ हजारांच्या खाली आली होती. आज मंगळवारी प्रतिदिन रुग्णवाढीचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ३ हजार ३८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पुणे शहरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील ५ आणि पुण्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. सध्या २२५ रुग्णा ॲाक्सिजनवर, इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर ३० तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २७ रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रूग्णांची संख्या ५ लाख ६९ हजार ८२८ वर गेली आहे. सध्या शहरात कोरोनाचे ३८ हजार ७ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात ९ हजार १५२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.