Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त, ११९२ नवीन रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:57 AM2020-08-05T11:57:16+5:302020-08-05T11:57:49+5:30

२ हजार १७२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

Corona virus : 1 thousand 312 corona free corona free, 1192 new patients in Pune city on Tuesday | Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त, ११९२ नवीन रुग्णवाढ

Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त, ११९२ नवीन रुग्णवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देआजपर्यंत शहरात एकूण ५९ हजार ४९६ जण कोरोना बाधित

पुणे : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात १ हजार १९२ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.

        पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ६५६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४०४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार १७२ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 

आजपर्यंत शहरात एकूण ५९ हजार ४९६ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रुुग्णसंख्या ही १६ हजार ८३३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ४१ हजार २५१ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ४१२ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        

-------------

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम सुरू असून, आत्तापर्यंतच्या १६ व्या फेरीपर्यंत १ कोटी ७८ लाख ९१ हजार ४५२ जणांची आरोग्य विषयक नोंद घेण्यात आली आहे. शहरातील बहुतांशी भागात ५२ लाख ५२ हजार ६४५ घरांमध्ये हे आरोग्य सेवक १६ वेळा गेल्या साडेचार महिन्यात पोहचले आहेत. सद्यस्थितीला याकरिता ५८२ टीम काम करीत असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली. 

-----------------------------------

दिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार ५९५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा २ लाख ९२ हजार ३९ वर गेला आहे. 

--------

Web Title: Corona virus : 1 thousand 312 corona free corona free, 1192 new patients in Pune city on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.