Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 11:46 AM2020-07-04T11:46:54+5:302020-07-04T11:47:43+5:30
पुणे शहरात बरे झालेल्यांची संख्या 12 हजारांवर
पुणे : जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी एका दिवसांत जिल्ह्यात १ हजार १९९ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहे. लोक सार्वजनिक ठिकाणी साधा मास्क देखील लावत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखले जात नाही. या सर्व गोष्टीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
----
बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १२ हजारांच्या प
पुणे शहरातील तब्बल १२ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ६२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक ८०७ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १९ हजार ८४९ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६१९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार ८७४ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शुक्रवारी रात्री साडे नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८०७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४३५ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३६१ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात शुक्रवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६८५ झाली आहे. दिवसभरात एकूण ६१९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३९९ रुग्ण, ससूनमधील १३ तर खासगी रुग्णालयांमधील २०७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १२ हजार २९० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ८७४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार २५० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २८ हजार ४४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
एकूण बाधित रूग्ण : २६१४३
पुणे शहर : १९७७७
पिंपरी चिंचवड :४१७२
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण :२१९९
मृत्यु : ८२२
बरे झालेले :७९२