Corona virus : पुणे जिल्ह्यात सोमवारी तब्बल १३५६ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २९ हजार ४०३
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 12:06 PM2020-07-07T12:06:54+5:302020-07-07T12:12:37+5:30
पुणे शहरात सोमवारी कोरोनाबधितांची संख्या ८६१ ने वाढली असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे : पुणे जिल्हयात २९ हजार ४०३ बाधित रुग्ण असून १७ हजार ३२९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ११ हजार १९९ व अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४९२ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८.९४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ३.९८ टक्के इतके आहे. सातारा जिल्हयातील १ हजार ३३४ बाधित रुग्ण असून ७९१ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या ४८८ अॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात सोमवारी कोरोनाबधितांची संख्या ८६१ ने वाढली असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २२ हजार ३८१ झाला असला तरी, आतापर्यंत १३ हजार ७३९ कोरोनाबधित कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही ७ हजार ९१२ इतकी आहे. शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६०४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २४२ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
सोमवारी १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७३० इतकी झाली आहे.
दिवसभरात एकूण ६३० रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४३० रुग्ण, ससूनमधील २२ तर खासगी रुग्णालयांमधील १७८ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या पुणे शहरात १३ हजार ७३९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर आज एकूण ४ हजार २८४ नागरिकांची स्वब घेण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ३६४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. आज पासून शहरात रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली असून, आज २६४ जणांची तपासणी करण्यात आली.
.....