पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवार (दि.५) रोजी एका दिवसांत ७९रूग्णांची वाढ झाली.तर पाच रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.पुणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोना विषाणूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये पुणे शहरामध्ये मंगळवारी ६३, पिंपरी चिंचवड शहरामध्ये १२ आणि कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण मध्ये ४ नवीन रूग्णांची भर पडली. यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २०१ वर जाऊन पोहचली आहे. तर एकूण मृत्यू १२० झाले आहेत. आत्तापर्यंत ६०८ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ---- शहरात कोरोना रुग्णसंख्येत ६५ ची भरपुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९४३ वर पोहचला असून मंगळवारी दिवसभरात ६५ रूग्णांची भर पडली. शहरात एकूण एक्टिव्ह रुग्ण १ हजार २९७ झाले आहेत. दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात नव्याने ६५ रूग्णांची नोंद करण्यात आली. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी २० जण व्हेंटिलेटरवर असून ५६ जण आयसीयूत उपचार घेत आहेत.शहरात मंगळवारी चार मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १११ झाली आहे. एकूण ५२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५३५ झाली आहे.
पुणे जिल्हा एकूण : 2201पुणे शहर : 1939पिंपरी चिंचवड: 137कॅन्टोनमेन्ट: 80 ग्रामीण : 45 एकूण मृत्यु : 120बरे होऊन घरी गेलेले : 608