Corona virus : नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनावर मात करणे अशक्य: अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:59 AM2020-08-08T10:59:26+5:302020-08-08T11:01:28+5:30

पुण्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो पुणे' हा उपक्रम सुरू

Corona virus : It is impossible to defeat Corona without the cooperation of citizens: Ajit Pawar | Corona virus : नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनावर मात करणे अशक्य: अजित पवार 

Corona virus : नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनावर मात करणे अशक्य: अजित पवार 

Next
ठळक मुद्देशहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन चाचणी करण्यात येणार

पुणे : नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविता येणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नातून मात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले़

पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन झिरो पुणे' या उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप,  दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रदीप देशमुख व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये 'कोरोना'च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो पुणे' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. अशावेळी कोरोनाच्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देणे आवश्यक आहे़ 

     भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व  मालेगाव येथे 'मिशन झिरो' मोहिम राबबिण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे ३ ते ५ हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------

Web Title: Corona virus : It is impossible to defeat Corona without the cooperation of citizens: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.