Corona Virus News : पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित ; ४९५१ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:53 AM2021-03-30T00:53:31+5:302021-03-30T00:55:18+5:30

पुण्यात सोमवारी दिलासादायक चित्र पाहायला मिळते आहे.

Corona Virus News: 4 thousand 961 new corona infected in Pune district on Monday; 4951 patients recovered from corona | Corona Virus News : पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित ; ४९५१ रुग्णांची कोरोनावर मात

Corona Virus News : पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित ; ४९५१ रुग्णांची कोरोनावर मात

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असतानाच सोमवारी थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीचा उच्चांक गाठत सात हजारांवर पोहचलला आकडा सोमवारी ५ हजारांवर आला. तसेच जवळपास ५ हजार लोकांनी कोरोनावर मात केली.

पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ रुग्णांची वाढ झाली.तसेच ४ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली.  पुणे शहरात २५४७ तर पिंपरीत १४७२ नवे कोरोनाबाधित आढळले. 

पुणे शहरात सोमवारी २७७१ तर पिंपरीत १३१५ रुग्णांनी कोरोनातुन ठणठणीत बरे झाले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरात ४ हजार ३४३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर २८ हजार ५३२ गृह विलगिकरणात उपचार घेत आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ७८३ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ४१२ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५० हजार ८९३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५ लाख १९ हजार ६०० झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १३ हजार ९५४ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४५ हजार ४९ झाली आहे.  
-------------   
शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १५ हजार १५३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २२९४० रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

Web Title: Corona Virus News: 4 thousand 961 new corona infected in Pune district on Monday; 4951 patients recovered from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.