पुणे : शहरात बुधवारी ३११ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४५६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्यस्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३ हजार ५३९ इतकी आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७५८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.६० टक्के इतकी आहे़ तर आज २३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ५६३ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ५५ हजार ५८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७३ हजार ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६१ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे.