Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३३१ नवे कोरोनाबाधित; २७७ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:27 PM2021-07-14T20:27:41+5:302021-07-14T20:34:08+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९१७
पुणे : शहरात बुधवारी ३३१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ९९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४़०८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९१७ असून, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५१८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ५४ हजार ९७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८२ हजार ५८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७० हजार ९९७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------