Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ४५० नवे कोरोनाबाधित तर ५१५ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:38 PM2021-06-03T20:38:32+5:302021-06-03T20:38:49+5:30
पुणे शहरात आत्तापर्यंत २५ लाख १८ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
पुणे : शहरात गुरूवारी ४५० कोरोनाबाधित आढळून आले असून, ५१५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार १६६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.५१ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार २१३ इतकी आहे. दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७६ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ३९१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ७४२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख १८ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७१ हजार २२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५७ हजार ६७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार ३४० जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------