पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी 9 हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले आहे.तर जवळपास ६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.
पुणे शहरात शुक्रवारी ४ हजार ६५३ तर पिंपरीत २ हजार ४६३ रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार ३३७ तर पिंपरीत १ हजार ५०७ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील आत्तापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या ३७ हजार १२६ झाली आहे. आणि पिंपरीत १६ हजार ३७९ इतकी आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार ९७ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ५४५ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ७३ हजार ७१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५ लाख ५१ हजार ५०८ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १६ हजार ३७९ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ५१ हजार ४८७ झाली आहे.
जिल्ह्यात ३२ हजार ८७७ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.
.......
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार ६५१ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ४७५ रूग्ण हे गंभीर आहेत. तर आज दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ३७ हजार १२६ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत १५ लाख १९ हजार ७८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ७८ हजार ९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३५ हजार ५९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
============