चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 11:56 AM2020-07-04T11:56:56+5:302020-07-04T12:50:45+5:30

काही वर्षांपूर्वी पिंपरी मधीलच एका महाशयांनी सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता...

Corona virus : Special person who wearing a gold mask in the Corona epidemic | चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

Next
ठळक मुद्देपाच तोळ्यांचा मास्क वापरण्यासाठी 2 लाख 90 हजार खर्च

पिंपरी:पुण्यातील गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी काही वर्षांपूर्वी पुरुषांसाठी सोन्याच्या चैनी, दागिने अशी नवी फॅशन आणली होती. त्यानंतर मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर 'गोल्डमॅन' तयार झाले. काही वर्षांपूर्वी भोसरीतील एका व्यक्तीने सोन्याचा शर्ट तयार करून घेतला.
आता पिंपरी-चिंचवडमधील एका बहाद्दराने सोन्याचा मास्क तयार करून घेतला असून, आपत्तीतही मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची चर्चा शहरात होत आहे.  हौस आणि प्रसिद्धीसाठी लोक काय करतील सांगता येत नाही. कोरोनाच्या आर्थिक संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवडमधील एका बहाद्दराने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. आपत्तीतही मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची चर्चा शहरात होत आहे. शंकर कुुऱ्हाडे असे त्या पिंपरीतील व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे.
हौसेला मोल नाही असे म्हणतात, त्यामुळे कोण काय करेल ते सांगता येणार नाही. आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी लोक काहीही करीत असतात.

पुण्यातील गोल्डमॅनची फॅशन काही वर्षांपूर्वी तत्कालीन मनसे आमदार रमेश वांजळे यांनी सोन्याच्या चैनी, दागिने घालत समाजात आणली होती. त्यांची ही  फॅशन त्यावेळी सर्वत्र तुफान 'हिट 'ठरली. त्यानंतर मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर 'गोल्डमॅन' तयार झाले. काही वर्षांपूर्वी भोसरीतील एका व्यक्तीने सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. त्यानंतर शंकर कुुहार्डे या व्यक्तीने सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. कोरोनाच्या कालखंडात कुऱ्हाडे यांचा मास्क चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
याविषयी शंकर कुऱ्हाडे म्हणाले, मला सोने घालण्याची आवड आहे. एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी चांदीचा मास्क तयार केला होता. त्यातूनच मला सोन्याचा मास्क तयार करण्याची कल्पना सुचली. आणि मी सोनारांकडे गेलो. मला मास्क तयार करून मिळेल का? अशी विचारणा केली. त्यांनीही संमती दर्शविल्याने मास्क तयार करून घेतला आहे. यासाठी साडेपाच तोळे सोने वापरले असून त्यासाठी २ लाख ९० हजार रुपये खर्च आला आहे.

Web Title: Corona virus : Special person who wearing a gold mask in the Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.