पुणे: पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर पुणे , पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाततील मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 वर जाऊन पोचली आहे.
यामध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा बळी गेला असून, कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्या 16 व्यक्तींना रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आले आहे. सोमवार (दि.16) रोजी पुण्यात तीन नवीन रुग्णांची भर पडली असून, हे तीनही रुग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात आतापर्यंत 1 हजार 116 कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल 1 हजार 18 संशयित रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 34 संशयितांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.सध्या शहर आणि ग्रामीण भागात विविध रूग्णालयात 82 संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.