कोरोना योद्ध्यांना जगण्याचा धर्म कळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:27+5:302021-08-22T04:14:27+5:30
जेजुरी: गेली दीड-दोन वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून सेवाभाव जपत जनमाणसाचे प्राण वाचवले. ...
जेजुरी: गेली दीड-दोन वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून सेवाभाव जपत जनमाणसाचे प्राण वाचवले. या सर्व कोरोना योद्ध्यांना जगण्याचा धर्म कळला, असे प्रतिपादन ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक उदयसिंह जाधव यांनी येथे केले आहे.
साकुर्डे (ता. पुरंदर) येथे ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्ध्यांना गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कोलते, माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, शामकांत भिंताडे, विराज काकडे, मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, अजिंक्य टेकवडे, बापू भोर, पिंटूशेठ जगदाळे, सुरेश सस्ते, निलेश जगताप, संग्राम सस्ते, माऊली चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
जाधव म्हणाले की, सेवाव्रत हे जगण्याचे जेव्हा साधन बनते तेव्हा कोणत्याही क्षेत्रात काम करणारा हा योद्धा ठरत असतो. सेवाभाव आणि सेवावृत्ती ही एक पूजाच मानायला हवी. सेवा ही आत्म्याला आनंद देणारी अनुभूती आहे. अशा सतवृत्तीना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या वेळी विजय कोलते, माणिक झेंडे सुरेश सस्ते आदींची भाषणे झाली.
या वेळी साकुर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रमिला जगताप, सदस्य सचिन थोपटे, अजित जाधव, राजेंद्र जाधव, विजय पवार, नीलम सस्ते माजी सरपंच तृप्ती जगताप, सविता जगताप, कोळविहिरे गणाच्या अध्यक्षा वृषाली काटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. तानाजी झेंडे यांनी केले, स्वागत युवराज जगताप यांनी केले, आभार पुष्कराज जाधव यांनी मानले.
या कोरोना योद्ध्यांचा झाला सन्मान
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, उदयसिंह जाधव, माणिक झेंडे, संदीप जगताप, महेश राऊत, ग्रामसेवक संजय भोसले, तलाठी बाबू आगे, आरोग्य विभागातील पौर्णिमा पांडव, सत्यभामा म्हेत्रे, वनिता लोंढे, मयूरी गोसावी, आशा भंडलकर, पोलीस पाटील प्रियांका चव्हाण, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक अनंता जाधव, शिक्षिका सोनाली गिरमे, चित्रा धनवडे, जयश्री मेढेकर, अंगणवाडी सेविका बेबी मारणे, शोभा सस्ते, सुवर्णा कदम, हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक गणेश कामथे, तानाजी झेंडे, सुरेश गरुड, रवींद्र शिंदे, दत्तात्रय शिंदे, अनिल जगताप, मापन्ना बनसोडे, विद्या पवार, ग्रामपंचायत कर्मचारी ज्योती सस्ते, संभाजी शेरे, त्याचबरोबर जेजुरी कैलास स्मशानभूमी येथील उपकार चॅरिटेबल ट्रस्टचे गणेश डोंबे, गणेश चव्हाण, रोहन जाधव, संकेत मुंडलीक, चंद्रकांत खोमणे, अविनाश झगडे, तुषार भापकर, अतुल सकट, विजय जाधव, मंगेश खोमणे आदींचा सन्मान केला.
२१ जेजुरी
साकुर्डे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.
210821\img_20210821_120438.jpg
साकुर्डे कोरोना योद्धा सन्मान