CoronaVirus News : पुणे शहरात शनिवारी १०५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ : ३८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:43 AM2020-10-04T11:43:31+5:302020-10-04T11:44:33+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ८७२ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात १०५५ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १२८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८९५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ८७२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५०५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २६ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ६०९ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार २८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख २८ हजार ९२५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ४६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १५ हजार ८७२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६८२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६ लाख ४३ हजार २० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.