Coronavirus: फक्त नोंदणी केलेल्या पुणेकरांनाच मिळणार गुरुवारी लस; महापालिकेची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:25 PM2021-04-28T23:25:46+5:302021-04-28T23:26:10+5:30
लसींअभावी पुणे शहरात लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर आज महापालिकेला फक्त २५००० डोस मिळाले आहेत.
पुणे - पुण्यात उद्या फक्त नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेने केली आहे. फक्त महापालिकेच्याच केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे. पुणे महापालिकेसा लसींचा फक्त २५००० डोसचा साठा आल्या मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लसींअभावी पुणे शहरात लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर आज महापालिकेला फक्त २५००० डोस मिळाले आहेत. त्यामुळे खासगी दवाखान्यांना लस न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ज्यांची ॲानलाईन नोंदणी आहे त्यांनाच लसीकरण करण्यात येईल. त्यातही दुसरा डोस असणाऱ्यांनाही प्राधान्य दिलं जाईल. तसेच वॅाक ईन लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी केल्याशिवाय महापालिकेच्या केंद्रावर येवु नये अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.