coronavirus in pune : भाजी, औषधे आणण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे त्रेधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 08:10 AM2020-03-25T08:10:43+5:302020-03-25T08:11:26+5:30
सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती.
पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या शट डाउनची घोषणा करताच नागरिकांनी घरामध्ये मुबलक धान्य भाजीपाला आणि औषधांचा साठा निर्माण करण्यासाठी दुकाणामध्ये गर्दी केली मात्र त्याच दरम्यान पावसाला सुरवात झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली.
सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती. पोलिसांच्या आदेशानुसार दुकानदारांनी जमाव पांगविण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याच्या सुचना केल्या होत्या,त्यामुळे दुकानाच्या बाहेर २००-३०० मिटर पर्यंत रांगेत नागरिक सामान घेण्यासाठी उभे होते. मात्र त्याच दरम्यान पावसाला सुरवात झाली त्यामुळे नागरिकांचे पावसात हाल झाले. मात्र अनेकांनी उद्या किराणा दुकाण चालू नसतील किंवा घराबाहेर पडणे कठीण होइल या भितीने पावसार उभा राहून किराणा माल खरेदी केला.
पावसानंतर भाज्यांचे भाव चौपट
सायंकाली ७ च्या सुमारास सिंहगड रोड कर्वेनगर परिसरातील रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर अनेल भाजी विक्रेत्यानी ठेला मांडला होता. मध्यरात्री नंतर सुरु होणाऱ्या २१ दिवसांच्या शट डाउनमुळे नागरिकांनी भाज्यांच्या खरेदीसाठीही एकच गर्दी केली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांनीही त्यांचा ठेला गुंडाळला. सुमार अर्धा पाउण तासाने पाउस संपल्यावर काही भाजी विक्रेत्यानी पुन्हा विक्रीला सुरवात केली मात्र त्यावेळी भाज्यांचे दर तब्बल तिप्पट ते चौपटीने वाढविलले होते. दहा रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची पेंडी तब्बल ४० रुपयाना तर १० रुपयांच्या हिरव्या मिरच्यांची जुडी ३० रुपयांपर्यंत चढ्या दराने विकण्यात आली.