CoronaVirus : मास्क घेताना आधी घ्या 'ही' माहिती आणि मग करा खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 03:03 PM2020-03-13T15:03:02+5:302020-03-13T15:04:56+5:30

नागरिकांची होणारी फसवणूक टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना काही टिप्स दिल्या आहेत. तेव्हा मास्क खरेदी करताना या टिप्सचा जरूर अवलंब करून फसवणूक टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. 

CoronaVirus :When buying a mask, take 'this' information first and then make a purchase | CoronaVirus : मास्क घेताना आधी घ्या 'ही' माहिती आणि मग करा खरेदी

CoronaVirus : मास्क घेताना आधी घ्या 'ही' माहिती आणि मग करा खरेदी

Next

पुणे : चीनमधून संपूर्ण जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूची लागण भारतातही झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा पुण्यात रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन, महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार नागरिक सॅनिटायझर आणि मास्क वापरत आहेत. मात्र त्यातही काही मेडिकल विक्रेते संधीचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करत आहेत. शिवाय अचानक मोठ्या संख्येने मागणी होत असल्याने कमी प्रतीचे सॅनिटायझर विकले जात आहे.  यासंबंधी एफडीएने आता थेट तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय पुण्यातल्या चार मेडिकलवर कारवाईही करण्यात आली आहे. नागरिकांची होणारी फसवणूक टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना काही टिप्स दिल्या आहेत. तेव्हा मास्क खरेदी करताना या टिप्सचा जरूर अवलंब करून फसवणूक टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. 

  • सॅनिटायझर परदेशातून आयात केल्यास त्यावर आयात लायसन्स नंबर टाकणे बंधनकारक आहे. तो नंबर बघूनच नागरिकांनी खरेदी करावी. 
  • सध्या पुण्यात तरी साधारण १६ हजार एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला देण्यात येणारे मास्क नक्की तेच आहे का याची खात्री करून खरेदी करावी. 
  • मेडिकलमधून मास्क आणि सॅनिटायझर घेताना त्याचे बिल घ्या.कोणतीही शंका असल्यास मेडिकलचे नाव, फोटो आणि खरेदी वस्तूचा फोटो एफडीएला मेल करू शकता. 
  • सॅनिटायझर खरेदी करताना त्यावर लायसन्स क्रमांक बघा. त्यावरून प्रॉडक्ट भेसळयुक्त आहे की विरहीत हे समजू शकेल. 

इथे नोंदवा तक्रार :

चढ्या दराने मास्क विक्री किंवा सॅनिटायझरच्या दर्जाबाबत शंका असा कोणताही प्रकार आढळला तर ०२०/२४४७०२७६ क्रमांकावर संपर्क साधावा.तक्रारदार fdadrugpune@gmail.com वरही संपर्क करू शकतात.  

Web Title: CoronaVirus :When buying a mask, take 'this' information first and then make a purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.