पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना

By admin | Published: June 14, 2014 12:03 AM2014-06-14T00:03:40+5:302014-06-14T00:03:40+5:30

महापालिकेच्या कार्यक्रमातून गायब झालेल्या फेट्यांची किमत पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे

Corporators now have 'cap' in the corporation | पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना

पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना

Next

पुणे : महापालिकेच्या कार्यक्रमातून गायब झालेल्या फेट्यांची किमत पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठीचे लेखी पत्र महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना देण्यात येणार असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ही रक्कम ४९ हजार ५०० रुपयांची आहे. ‘फेट्यांनी घातली महापालिकेस टोपी’ या वृत्ताद्वारे लोकमतने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पालिकेने नूतनीकरण केलेल्या या सभागृहाचे उद्घाटन आणि शारदाबाई पवार शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन १७ जानेवारी २०१४ रोजी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार, आमदार, तसेच महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका यांना फेटे बांधण्याची व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार, सुमारे २०० मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले होते. हे फेटे एका दिवसासाठी फेटा बांधणीसह २५० रुपये या दराप्रमाणे भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर ११० मान्यवरांनी हे फेटे परत केले. ९० जण मात्र चक्क फेटे घरीच घेऊन गेले. यामुळे या फेट्यांच्या भरपाईपोटी प्रतिनग ५५० रुपये ठेकेदाराला द्यावे लागणार आहेत. ही रक्कम सुमारे ४९ हजार ५०० रुपये आहे. स्थायी समितीनेही हा निधी देण्यास गुपचूप मान्यता दिली होती. मात्र, आता ही रक्कम नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Corporators now have 'cap' in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.