पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 07:00 PM2020-09-18T19:00:41+5:302020-09-18T19:01:44+5:30

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यूूचा निर्णय घेऊ शकता, माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल

Curfew can impose in Pune! But this will not work for me: clear instructions from the Guardian Minister | पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार

पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार

Next
ठळक मुद्देशुक्रवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक

पुणे : पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जनता जनता कर्फ्यूू लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, त्याला माझी सहमती असेल. परंतु उद्योग धंद्यावर परिणाम झालेला मला चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे तूर्त तरी पुण्यात लाॅकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले. 

कोरोनाचा वाढता प्रर्दुभाव लक्षात घेऊन गुरूवारी मुंबई शहरात 144 कलमानुसार संचारबंदी लागू केली. त्यानंतर मुंबई सारखीच संचारबंदी पुण्यात देखील लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या. त्यात पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (दि.18) रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याबाबत पवार यांच्या बैठकीत पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मुंबईमध्ये 144 कलम लागू केले आहे त्या धर्तीवर पुण्यात देखील काय निर्णय घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर अजित पवार यांनी सध्या रुग्ण वाढत असले तरी नागरिकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. तसेच कोरोनामुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यूूचा निर्णय घेऊ शकता, माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल, असे देखील पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Curfew can impose in Pune! But this will not work for me: clear instructions from the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.