औंध एम्स हॉस्पिटलमध्ये लसीकरणाबद्दल उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:18 AM2021-03-04T04:18:54+5:302021-03-04T04:18:54+5:30
नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत उत्सुकता पाहायला मिळत असून लसीकरण केंद्र वरती नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हॉस्पिटलच्या ...
नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत उत्सुकता पाहायला मिळत असून लसीकरण केंद्र वरती नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून कोविड लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या नागरिकांनाच लसीकरण करण्यात येत आहे. तीन मार्चपासून औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या वेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड एम्स हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर गोकुळ गायकवाड उपस्थित होते.
प्रतिक्रिया, लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल प्रशासनदेखील नागरिकांची काळजी घेत असून, अद्यापपर्यंत तरी लसीकरण कार्यक्रमात कोणतेही अडथळे आले नसून कार्यक्रम यशस्वीपणे सुरू आहे.
-गोकुळ गायकवाड, मॅनेजिंग डायरेक्टर