नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 03:49 PM2020-09-26T15:49:12+5:302020-09-26T15:50:29+5:30

पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकऱ्याही घटल्या आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल ...

Cyber thieves robbed a woman of Rs 12 lakh by offering her a job in a reputed company | नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले

नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकऱ्याही घटल्या आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल तर त्यासाठी लोक काहीही करायला तयार होऊ लागले आहेत. त्याचा आता सायबर चोरटे गैरफायदा घेऊ लागले आहेत. 
एका महिलेला नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल ११ लाख ९९ हजार ६११ रुपये भरायला भाग पाडले. याप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिला आणखी चांगली नोकरी हवी असल्याने तिने नोकरी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. तिला २१ मे रोजी फोन आला़ रिक्रुटमेंट इन डिड या रिक्रुटमेंट एजन्सीमधून बोलत असल्याचे भासविले. तिला नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

श्रृती नायर, रोहित गुप्ता, प्रतिक वर्मा, आनंद, सुधांशु मिश्रा अशा वेगवेगळ्या नावाने त्यानंतर तिला फोन करण्यात आले. नोकरीसाठी रजिस्टेशन, ऑनलाईन मुलाखत, प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ७ ते ८ वेळा एकूण ११ लाख ९९ हजार ६११ रुपये रिक्रुटमेंटइनडिड या या वेबसाईटवरील लिंकवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यापैकी ३ लाख ३९ हजार १४ रुपये परत केले. परंतु कोणतीही नोकरी न देता फिर्यादी महिलेने ट्रान्सफर केलेली ८ लाख ६० हजार ५९७ रुपये परत न करता फसवणुक केली. आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून पोलीस निरीक्षक एच़ टी़ कुंभार अधिक तपास करीत आहे.

Web Title: Cyber thieves robbed a woman of Rs 12 lakh by offering her a job in a reputed company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.