सायकलवैभव परतणार! स्वतंत्र मार्गाचे जाळे, पाच कंपन्यांनी दिले प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:26 AM2017-12-16T06:26:17+5:302017-12-16T06:26:25+5:30

एकेकाळी सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल ८३४ किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे १ लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत.

Cycling will return! Independent route network, five companies offered the offer | सायकलवैभव परतणार! स्वतंत्र मार्गाचे जाळे, पाच कंपन्यांनी दिले प्रस्ताव

सायकलवैभव परतणार! स्वतंत्र मार्गाचे जाळे, पाच कंपन्यांनी दिले प्रस्ताव

Next

पुणे : एकेकाळी सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल ८३४ किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे १ लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत. त्यांच्यासाठी ५ हजार सायकल स्टेशन आणि काही हजार सायकल तळ तयार करण्याचे नियोजन आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील अनेक रस्त्यांवर सायकल ट्रॅक उभारण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश सध्या निरुपयोगी आहेत. नव्या सायकल योजनेची तशीच गत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेत गुरुवारी सायकल आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तीन वर्षांच्या कालावधीसाठी या प्रकल्पाला ३३५ कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे.
महापालिकेने एका खासगी कंपनीकडून हा सायकल शेअरिंगचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे अनुदानही महापालिकेला मिळाले आहे. पुण्याचे सायकलवैभव परतून आणण्याची हमीच या प्रकल्प अहवालात देण्यात आली आहे. तो वाचूनच सायकलींच्या देश-परदेशातील पाच कंपन्यांनी महापालिकेकडे हे काम करण्याची त्यांची इच्छाही लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे.
तीन प्रकारचे सायकलमार्ग यात सूचित करण्यात आले आहेत. विभक्त सायकलमार्ग - रहदारीच्या रस्त्यापासून १ मीटर रुंद सोडणे. रंगीत सायकलमार्ग- अरुंद रस्त्यावर रस्त्याच्याच एका बाजूला रंग लावून सायकल लेन तयार करणे. हरित सायकलमार्ग- कॅनॉल, ओढे, नद्या, टेकड्या यांच्यालगत हरित सायकल लेन (ग्रीन वे) तयार करणे.
शहराचा मध्यवर्ती भाग सायकल व पादचारी स्नेही करण्यासाठीही काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील विशिष्ट रस्ते मोटार व दुचाकीमुक्त करावेत. मध्यवर्ती भागाभोवती वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित करावा व त्यावर वाहतूक होऊ देऊ नये, जुन्या इमारती, शाळा, मोकळी मैदाने यामध्ये सायकल तळासाठी प्राधान्य द्यावे, रस्त्यांवरही एका बाजूने पूर्ण सायकलतळ ठेवावा, त्याला शुल्क आकारू नये, सायकल स्टेशन्स मेट्रो, सार्वजनिक बस वाहतूक, रिक्षा थांबे यांच्याजवळ असावीत. एका ठिकाणाहून घेतलेली सायकल दुसºया ठिकाणी जमा करता यावी, असे नमूद करण्यात आले आहे.
सायकल झोनची निर्मिती- यानुसार शहरात विविध ठिकाणी सायकल झोन तयार करण्यात येणार आहेत. सायकल देण्याघेण्याचे व्यवहार या झोनमधून होतील. त्यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल. वाहतूक पोलीस, आरटीओ यांचे साह्य यासाठी घेण्यात यावे. सायकल शेअरिंग योजनेतील सायकलींशिवाय झोनमध्ये खासगी सायकलीही ठेवण्याची मुभा असेल. दुचाकी किंवा अन्य वाहनांना मात्र तिथे मनाई असेल.

सायकलिंगचा प्रसार व्हावा यासाठीही काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महापालिकेत सायकल विभाग हा स्वतंत्र विभाग करावा, त्यावर अधीक्षक अभियंता श्रेणीचे अधिकारी नियुक्त करावेत, असे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय या विभागात तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी द्यावेत. सायकल शेअरिंगची सर्व जबाबदारी या विभागाची असेल. हा विभाग सायकल शेअरिंगमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये काय चालले आहे त्याची अद्ययावत माहिती ठेवेल व त्याचा उपयोग शहरातील योजनेसाठी वेळोवेळी करेल.

- सायकल वापरासाठी प्रत्येक वेळेला सुटे पैसे वगैरे द्यावे लागणार नाहीत. महापलिका त्यासाठी स्वतंत्र मी कार्ड तयार करणार आहे. हे कार्ड वापरले की त्यातून पैसे चुकते होतील. तसेच सायकलला असलेले कुलूप हेच सुरक्षा कुलूप आहे. संपूर्ण स्वयंचलित असलेली डॉकलेस यंत्रणा त्यासाठी वापरण्यात येणार आहे. यात स्मार्टफोन किंवा त्यासारख्या तंत्राच्या साह्यानेच कुलूप उघडता येते.

- तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे १ लाख सायकली घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडे आताच पाच कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत.

- शहरातील रस्त्यांची पाहणी करून आता याप्रमाणे सायकलींसाठी मार्ग तयार करण्यात येतील. रस्त्याच्या डाव्या बाजूने
४३१
व उजव्या बाजूने
३९३
असे एकूण
८२४
किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक शहरात या योजनेतंर्गत तयार होतील.

Web Title: Cycling will return! Independent route network, five companies offered the offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे