शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

By admin | Published: September 25, 2015 1:00 AM

ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली.

पिंपरी : ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी झाले. या वेळी अभिनेता देवदत्त नागे, महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे, तेजश्री अडिगे, राजू गोलांडे, अमित गोरखे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. त्यानंतर औपचारिक उद्घाटन सोहळा झाला.अभिनेता नागे म्हणाले, ‘‘शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमामुळेच शहराची संस्कृती टिकून आहे. पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलच्या माध्यमातून ही पर्वणीच आज शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. मी व्यसनापासून नेहमीच दूर राहिलो आहे. म्हणूनच जय मल्हार मालिकेमध्ये ‘खंडेराय’ म्हणून उभा राहू शकलो. आज मी तुमच्या सर्वांकडून व्यसनापासून अलिप्त राहण्याचे वचन मागतो. कोणत्या गोष्टी जवळ करायच्या व कोणत्या गोष्टी नाही, याकरिता ‘इगो’ नको, तर ‘इको फें्र डली’ राहा. तरुणांनो, व्यसन दूर ठेवा.’’खासदार बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांमुळे शहरात उत्सव टिकून आहेत. त्यामुळेच जय मल्हार मालिका घराघरांत पोहोचली आहे, अशा उत्सवात सातत्य हवे.’’ लोकशाहीर जैनू शेख यांनी शिवरायांवर अप्रतिम असा पोवाडा सादर केला, तर सह्याद्री ढोल-ताशा पथकाने विशेष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. पश्चिम सांस्कृतिक मंत्रालयाच्या ९५ कलाकारांनी कलात्मक बहारदार नृत्याने उपस्थितांचे मनोरंजन केले. यामध्ये गुजराती आदिवासी समाजाचे डांग नृत्याने सर्वांचे डोळे दिपले. आदिवासी समाजातील आवाहनात्मक कलाविष्कार महिला व पुरुषांनी मिळून सादर केले. अंबे, जोगवा दे जागरणगोंधळाचे अप्रतिम सादरीकरण या वेळी करण्यात आले. गोव्याचे पारंपरिक नृत्य, उत्तर प्रदेशाचे मयूरनृत्य, राजस्थानचे चक्रीनृत्य, महाराष्ट्राचे धनगरी समाजाचे नृत्य ‘धनगरवाड्यात घुसला,’ तर ‘पाडाची गं’, लावणी नृत्य वर्षा दरपे यांनी सादर केले. तसेच शेतकरी गीत कलाप्रकारही या वेळी झाला. राजमुद्रा संस्थेच्या ३५ कलाकारांनी लोककला कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. प्रशांत पाटील व संतोष लिंबोरे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रवीण तुपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)