मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:37 PM2018-07-19T23:37:23+5:302018-07-19T23:37:35+5:30

पारगाव (ता. दौंड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

Danghdhhishek laid on the image of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

Next

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
या वेळी सहकारमहर्षी पोपटराव ताकवणे म्हणाले, की सध्या आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल. सरकार दूध उत्पादक शेतकºयांसाठी न्याय देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. उपाध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले, की लिटरमागे ५ रुपये शासनाने अनुदान द्यावे अशी आमची भूमिका आहे. गुजरात सरकारला अनुदान देणे शक्य आहे, मग महाराष्ट्र सरकारला अशक्य नाही.
या वेळी किसन जगदाळे, सुरेश ताकवणे, दत्तात्रेय ताकवणे, राजाभाऊ बोत्रे, दत्तात्रेय आल्हाट, दत्ता दिवेकर, रामकृष्ण ताकवणे, रामदास ताकवणे, विश्वास ताकवणे, दत्तात्रेय टिळेकर, स्वामी शेळके आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. रेणुकादेवी दूध उत्पादक संस्थेचे दूधसंकलन बंद ठेवून अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांनी सरकारचा निषेध केला.

Web Title: Danghdhhishek laid on the image of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.