नसरापूर : ‘रामा रामा हो रामा’ अशा गजरात श्री बनेश्वर महाराजांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा उत्साहात पार पडली. त्या वेळी नसरापूरवासीयांनी महाराजांचे दर्शन घेतले. निमित्त होते ते श्रावणी अमावास्येचे.
सालाबादप्रमाणे काही मोजक्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आज श्रावणी अमावास्याचे औचित्य साधून याही वर्षी श्री बनेश्वर महादेवाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी नसरापूर गावात आली होती. या वेळी गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन बनेश्वर महाराजांनी ग्रामस्थांना दर्शन दिले.
या वेळी बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत कदम, अनिल गयावळ, यशवंत कदम, सुभाष चव्हाण, पुजारी रवींद्र हरगुडकर, सुधीर साळुंखे, ग्रामस्थ दत्तात्रेय वाल्हेकर, विश्वनाथ वाल्हेकर, राजू चव्हाण, विजय जंगम, सचिन शिर्के, बाळासाहेब राशिनकर, तुकाराम झोरे, शैलेश झोरे, आबा
शेटे, चैतन्य लिंगडे, श्रावण औराद, दीपक पवार आणि महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
---
वर्षातून एकदाच दर्शनासाठी महाराज नगरात
वर्षातून एकदाच श्रावणी अमावास्यानिमित्त बनेश्वर महाराज पालखीतून ग्रामस्थांसाठी दर्शनासाठी येत असतात. ग्रामप्रदक्षिणेचे वेळेस पालखी गावातील मुख्य देवस्थानसमोर आरती करून पालखी पुढे मार्गस्थ होत होती. या वेळी ग्रामस्थांना, बालगोपाळांना बनेश्वर महाराजांचे दर्शन घडले.