दौंड, इंदापूर, बारामतीला आज मिळणार पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 12:54 AM2018-10-28T00:54:16+5:302018-10-28T00:54:59+5:30
पालिकेमुळे रखडले शेतीचे आवर्तन; शेतकऱ्यांच्या नजरा कालव्याकडे
पुणे : कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून अद्याप कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. पालिकेने रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
दांडेकर पुलाजवळ कालवा फुटण्याची दुर्घटना घडल्यामुळे जलसंपदा विभाग व पालिका प्रशासनातर्फे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दुरूस्तीची कामे संस्थ गतीने सुरू असल्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सोडता आले नाही. कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, रविवारपासून पाणी सोडण्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून जनता वसाहत येथे कालवा फुटल्याच्या बाजूला राम मंदिराजवळ संरक्षक भिंत उभारण्याचे काम शनिवारपर्यंत सुरू होते. भिंत बांधून झाली असली तरी कालव्यामध्ये उतरवण्यात आलेली यंंत्रसामुग्री, इतर साहित्य बाहेर काढण्याचे शनिवारपर्यंत सुरू होते. रात्री उशीरापर्यंत किंवा सकाळी हे साहित्य काढून रविवारी दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे,असे खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार यांनी सांगितले.
शेलार म्हणाले,पाटबंधारे विभागाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे.मात्र,पालिकेकडून अजूनही दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत.पालिकेकडून दुरूस्तीच्या कामासाठी कालव्यात टाकण्यात आलेली माती अद्याप काढण्यात आली नाही.पालिकेने सकाळी लवकर हे काम पूर्ण केल्यास दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडता येईल.
खडकवासल्यातून प्रथमत: ६०० ते ७०० क्यूसेक पाणी सोडण्यात येईल.पाणी सोडल्यानंतर कालव्याला काही धोका आहे का? याची पहाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांकडून केली जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्याने ३०० क्यूसेकने पाणी वाढविले जाईल.कालव्यातून १,३०० क्यूसेकपर्यंत पाणी वाढविले जाईल.
महिनाभर कालवा दुरूस्तीचे काम बंद सुरू असल्यामुळे शेतक-यांचे खरीपाचे आवर्तन बंद करावे लागले.मात्र,रब्बी हंगामासाठी 15 आॅक्टोबरपासून पाणी सोडले जाणार होते.परंतु,दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने दौंड,इंदापूर,बारामतीसाठी पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत.अखेर रविवारी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.