रणपिसे वस्ती परिसरातील एका शेतात शुक्रवारी भर दुपारी बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले व सायंकाळी पुन्हा दर्शन राक्षेवाडी परिसरात नागरिकांना झाले बिबट्या दिसला त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या किती आहे हे समजणे कठीण झाले आहे कारण बिबट्या हा शेतातून आता रानातील वस्तीकडे भक्ष्याच्या शोधार्थ फिरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात आंधळगाव परिसरात बिबट्याचे पिल्लू( बछडा)आढळल्यामुळे या भागातील भीती कमी होती ना होती तोच रांजणगाव सांडस परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक शेतात जाण्यास घाबरत आहे. या भागात बिबट्याला लपण्यासाठी वि स्तीर्न असे भीमा नदीचे कुरन क्षेत्र आहे. मेंढपाळ व्यवसाय शेळ्या-मेंढ्या शेतात जाण्यासाठी करत असताना सायंकाळी मेंढपाळ व्यवसाय शेळ्यामेंढ्या घरी परतत असताना बिबट्याने ही मेंढ्या वरती हल्ले केलेले आहेत त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या करपा च्या पाठीमागे बिबट्या हा फिरत असल्याचे मेंढपाळ व्यवसाय बोलत आहे त्यामुळे या भागात वनविभागाला वारंवार विनंती अर्ज करूनही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावत नसल्यामुळे वनविभाग नागरिका वरती हल्ला झाल्यावर आपल्याला पकडणार की काय असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे.
--
कोट
भीमा नदीकाठी विस्तीर्ण कुरन क्षेत्रात शितोळे वस्ती, शिंदे वस्ती ,राक्षेवाडी या भागात वनविभागाला विनंती करूनही पिंजरा लावले जात नसल्यामुळे व वीज भारनियमन हे रात्रीचे असल्यामुळे बिबट्या हा घरा शेजारील गोठ्यात येऊन बसला तरी दिसत नाही त्यामुळे वनविभागाने या भागात हाय मॅक्स दिवे लावावेत
- सुधीर राक्षे पाटील (माजी उपसरपंच)
रांजणगाव सांडस रणपिसे