लोणावळा: लोणावळा येथील वलवन धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवक आणि युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना आज सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मोईज साजिद खान (वय १५ रा.कोंढवा) व खुशी समीर शेख (वय १४, रा.लोणावळा) अशी या मयत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. मोईज हा चार दिवसांपूर्वी लोणावळ्यातील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो नातेवाईकांसोबत वलवन धरणाच्या पाठीमागील बाजूला फिरण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी तो आणि खुशी हे इतरांसोबत पाण्यात खेळण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. काही स्थानिकांच्या मदतीने मोईज आणि खुशी यांना पाण्याच्या बाहेर काढून लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी के. एस. रसीवाला (वय ६४, हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहे.
लोणावळ्याच्या वलवन धरणात अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 8:17 PM
लोणावळा येथील वलवन धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवक आणि युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ठळक मुद्देपाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले