कुलस्वामी सभागृह मोफत देण्याचा निर्णय दिशादर्शक : अशोकलाल पगारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:45+5:302021-03-15T04:10:45+5:30

धामणी येथील खंडोबा मंदिरासमोर भाविक व ग्रामस्थाच्या सहकार्यातून कुलस्वामी सभागृह बांधण्यात आला आहे. नुकतेच त्या हाॅलमध्ये धामणी व ...

Decision to give Kulswami Hall for free Guide: Ashoklal Pagaria | कुलस्वामी सभागृह मोफत देण्याचा निर्णय दिशादर्शक : अशोकलाल पगारिया

कुलस्वामी सभागृह मोफत देण्याचा निर्णय दिशादर्शक : अशोकलाल पगारिया

Next

धामणी येथील खंडोबा मंदिरासमोर भाविक व ग्रामस्थाच्या सहकार्यातून कुलस्वामी सभागृह बांधण्यात आला आहे. नुकतेच त्या हाॅलमध्ये धामणी व हाजी टाकळी येथील नववधू दाम्पत्याचा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या संसर्गामुळे पन्नास वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत कोरोनाचे आवश्यक नियम पाळून हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी धामणीच्या ग्रामस्थानी पंचक्रोशीतील भाविकांसाठी देवस्थानाचा कुलस्वामी हाॅल विनामूल्य देण्याचे जाहीर केले आहे. प्रा. पगारिया कुलस्वामी खंडोबाच्या दर्शनासाठी मंदिरात आले असता त्यांनी मंदिर व मंदिर परिसरात चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या जिर्णोध्दाराच्या कामाची बारकाईने पाहाणी करुन समाधान व्यक्त केले. कुलस्वामी सभामंडप लग्न कार्यासाठी मोफत देण्याची माहिती ग्रामस्थानी त्यांना यावेळी दिला. धामणीकरांचा हा निर्णय स्तुत्य असून कोरोनाचे आवश्यक नियम पाळून मोजक्या ५० वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीतच या हाॅलमध्ये लग्नकार्य व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलस्वामी मंडप परिसरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सभागृहात पगारिया कुटुंबीयाचे वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे अशोकलाल पगारिया, विलासलाल पगारिया,मयुर पगारिया, कल्पेष पगारिया व त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी जाहीर केले. पगारिया कुटुंबीयाचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सावता माळी विकास मंडळ धामणीचे अध्यक्ष ज्ञानेश्वरमाऊली विधाटे, शांताराम जाधव, विलास पगारीया, बाप्पु काचोळे, दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, बाळासाहेब लालजी बढेकर, नामदेव भगत, सुरेश बढेकर, गणेश रोकडे, राजेश भगत उपस्थित होते.

Web Title: Decision to give Kulswami Hall for free Guide: Ashoklal Pagaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.