शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

विद्यार्थ्यांना हेल्मेटसक्तीबाबत संस्थात्मक चर्चेनंतर निर्णय

By admin | Published: March 08, 2016 1:33 AM

विद्यार्थी व शिक्षकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्याबाबत महाविद्यालयांनी प्रबोधन करून योग्य कार्यवाही करावी.

पुणे : विद्यार्थी व शिक्षकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्याबाबत महाविद्यालयांनी प्रबोधन करून योग्य कार्यवाही करावी. तसेच महाविद्यालयाच्या आवारात विनाहेल्मेट कोणालाही प्रवेश देऊ नये, अशी जबाबदारी प्राचार्यांवर सोपविण्यात आली आहे. हेल्मेट वापराबाबत प्राचार्यांकडून स्वागत केले जात असले; तरी संस्थात्मक पातळीवर चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पुण्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंंडळाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना हेल्मेट वापराबाबत परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. हेल्मेट वापराबाबत प्रबोधन व कार्यवाही करण्याची जबाबदारी प्राचार्यांकडे सोपविली आहे. प्राचार्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागतच केले. मात्र, अंमलबजावणीबाबत संस्थात्मक पातळीवर चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनीही हेल्मेट वापराबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच प्रमाणे एकदमच या निर्णयाची अंमलबजावणी न करता त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.> हेल्मेट वापरण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहे. विद्यापीठ व प्रादेशिक परिवहन विभागाने पाठविलेले परिपत्रक महाविद्यालयाच्या आवारात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. महाविद्यालयाच्या आवारात हेल्मेट वापरण्याबाबत विद्यार्थी व शिक्षकांना आवाहन केले जाईल. मात्र, संस्थास्तरावर याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. -डॉ. रवींद्रसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज