मराठेंच्या जामिनावर आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:22 AM2018-06-26T03:22:50+5:302018-06-26T03:22:53+5:30
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे.
विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सोमवारी मराठे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकार आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
मराठे यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून पोलिसांनी आरबीआयची परवानगी घेणे आवश्यक होते. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास सीबीआयने करणे अपेक्षित आहे. मुळात ठेवीदारांची फसवणूक आणि कुलकर्णी यांना देण्यात आलेले कर्ज या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.