पुण्यात नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:26 AM2018-07-27T02:26:36+5:302018-07-27T02:26:58+5:30

कार्यालयीन जागांचा अभाव; ३ वर्षांपासून प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले, अहवालातील निष्कर्ष

Decrease in the creation of jobs in Pune | पुण्यात नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झाली घट

पुण्यात नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झाली घट

Next

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : पुण्यामध्ये कार्यालयांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्याने रोजगार निर्मितीमध्ये घट होत आहे. यामुळे यावर्षी पुण्यात नोकºयांचे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे होत आहे. २0१५ मध्ये नोकºयांची निर्मिती १५ टक्क्यांनी कमी झाली होती. नाइट फ्रैंकच्या ‘इंडिया रियल एस्टेट रेसिडेंशिअल एंड आॅफिस जानेवारी—जून २0१८’ या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात २0१८ मध्ये 0.२५ मिलियन चौरस मीटर कार्यालयीन जागा उपलब्ध झाली. सहा महिन्यांत इतकी जागा मिळणे ही मोठी बाब आहे परंतु ती रोजगारनिर्मितीसाठी अतिशय अपुरी आहे. २0१५ मध्येही उपलब्ध झालेली 0.९२ मिलियन चौरस मीटर जागा अतिशय कमी होती. अहवालाचील माहितीनुसार पुण्यात आयटी व त्यावर आधारित क्षेत्र (आयटीईएस) सर्वात मोठे आहे. कार्यालयासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याचा प्रतिकूल परिणाम रोजगारांवर होत आहे. व्यावसायिक प्रकल्प तयार होण्यातच बराच काळ जातो. त्यानंतर कार्यालयीन जागा मिळाली तरी आवश्यक व्यवस्था तयार करण्यात तीन ते चार वर्षे जातात. तोवर नोकºयांची निर्मिती होत नाही.
बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, इन्शुरन्स क्षेत्र यांनी गेल्या १८ महिन्यांत आपले लक्ष पुण्यावरच मोठ्या प्रमाणात केंद्रित केल्याचे दिसत आहे. शिवाय आयटी-आयटीईएस यांनी जागा घेऊनच ठेवल्या आहेत. आसपासच्या बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागांत देवाण-घेवाणीचे ६७ टक्के व्यवहार पूर्ण झाले आहेत.

Web Title: Decrease in the creation of jobs in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.