तूट निश्चित होण्याआधीच निधीचा प्रस्ताव

By admin | Published: April 25, 2016 01:31 AM2016-04-25T01:31:47+5:302016-04-25T01:31:47+5:30

पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या संचलन तुटीपोटीची रक्कम ११ समान हप्त्यांमध्ये दरमहा ७.५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे.

Before the deficit was decided, the proposal for funding | तूट निश्चित होण्याआधीच निधीचा प्रस्ताव

तूट निश्चित होण्याआधीच निधीचा प्रस्ताव

Next


पुणे : पीएमपीची २०१५-१६ या आर्थिक वर्षाची तूट निश्चित होण्या आधीच पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या संचलन तुटीपोटीची रक्कम ११ समान हप्त्यांमध्ये दरमहा ७.५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा संचलन तूट अधिक निघाल्यास त्यासाठी प्रशासनास पुन्हा स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.
पीएमपीची संंचलन तूट भरून देण्याची जबाबदारी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, संचलन तुटीची ६० टक्के रक्कम पुणे महापालिका, तर ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका देते. मागील वर्षी रक्कम जवळपास १६२ कोटींची होती. दोन्ही महापालिकांकडून वर्षाच्या अखेरीस ही रक्कम देताना ती मोठ्या प्रमाणात असल्याने नगरसेवकांकडून विरोध केला जातो. त्यामुळे ही रक्कम समान हप्त्यांमध्ये देण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी ही रक्कम समान हप्त्यांमध्ये देण्याची मागणी केली होती. ती दोन्ही महापालिकांनी मंजूर केली होती. त्यानुसार, मागील वर्षी ही रक्कमही दिली आहे.

Web Title: Before the deficit was decided, the proposal for funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.