देहूगाव कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ? गाथा मंदिरात आढळले तब्बल १८ कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:26 PM2021-03-08T17:26:23+5:302021-03-08T17:27:56+5:30

श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच देहूगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे...

Dehugaon Corona's 'hotspot' ? As many as 18 patients were found in Gatha temple | देहूगाव कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ? गाथा मंदिरात आढळले तब्बल १८ कोरोनाबाधित रुग्ण

देहूगाव कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ? गाथा मंदिरात आढळले तब्बल १८ कोरोनाबाधित रुग्ण

googlenewsNext

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा (दि. ३० मार्च ) अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच देहूगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. हे गेल्या तीन ते चार दिवसांत येथील गाथा मंदिराच्या आवारात १८ रुग्ण सापडले असून देहूतील विविध भागात ३४ रुग्ण आढळल्याने देहूगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून येथे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे.

देहूगावमध्ये नव्यानेच नगरपंचायत स्थापन झाली असून नगरपंचायतीकडे आरोग्य विभागच स्थापन झालेला नाही. त्यामुळे त्यांना सध्या तरी जिल्हा परिषदेच्या सहकार्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून आर्थिक मदत व कर्मचारी वर्ग उपलब्धतेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने सध्या देहूकरांना अडचणींना सामना करावा लागत असून नागरिकांनांच स्वताची काळजी घ्यावी लागणार आहे.

देहूगाव येथे गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. देहूत सध्या 40 रुग्ण असून त्यातील 26 जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. येथील गाथा मंदिरात काही लोक विविध कामासाठी नेमलेले आहेत. शिवाय येथे वारकरी प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते. येथील एका व्यक्तीला कोवीडची लक्षणे आढळून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली व मंदिरातील त्याच्या संपर्कातील 72 जणांची तपासणी करण्यात आली असता, 72 पैकी १८ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने त्यांचे तेथेच गृहविलगीकरण करण्यात आले आहे. इतर रुग्णांमध्ये सध्या पिंपरी चिंचवड मधिल कोडीड सेंटर मध्ये ७, खाजगी रुग्णालयात ८ उपचार घेत आहेत.

कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्याने येथील प्रशासक तहसिलदार मधुसुन बर्गे यांनी देहूगावत मायक्रो कंटेमेंट झोन जाहीर करण्यासंदर्भात हवेली प्रांत यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. यामध्ये चव्हाणनगर भाग २, गाथा मंदिर, आद्यराही सोसायटी, श्रीकृष्ण मंदिर आश्रम, काळोखे वाडा हे भाग मायक्रो झोन म्हणून जाहीर करावेत म्हणून प्रशासकांकडून प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी दिली.

हवेली पंचायत समिती व जिल्हा परिषदेने देहूतील सुपर स्प्रेडर लोकांची तात्काळ तपासणी मोहीम हाती घेवून सहकार्य करावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्याच प्रमाणे गावातील कोवीड सेंटर सुरू करण्यासंदर्भातील ताताडीने निर्णय घ्यावा व तेथे रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची व्यवस्था करावी किंवा इतर खाजगी रुग्णालयात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देता येईल काय याचाही विचार करणे आवश्यक आहे.
आकडेवारी- 
गाथा मंदिर १८
माळीनगर ८
विठ्ठलनगर ४
इंद्रायणी सोसायटी १२.             

Web Title: Dehugaon Corona's 'hotspot' ? As many as 18 patients were found in Gatha temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.