दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:12 AM2018-06-13T01:12:27+5:302018-06-13T01:12:27+5:30
जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दा-या घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दाºया घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले. दा-या घाटाचा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण व शासन सकारात्मक असून निश्चित मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले. याबाबत तातडीने संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन प्रशासकीय पूर्तता करून घेण्याच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांना गडकरी यांनी दिल्या. लोणावळा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगी दौºयावर आले असताना तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी दाºया घाटाबाबत त्यांचेकडे आग्रही भूमिका मांडली. पर्यटन तालुका घोषित झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात राज्यातून पर्यटकांचा मोठा ओघ वाढणार आहे. दाºया घाटामार्गे जुन्नर ते मुंबई हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या मुंबईला माळशेज घाटर्मार्ग लांबचा वळसा घालून जावे लागते. जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल मुंबईला पाठविला जातो. ही वाहतूक दाºया घाटमार्गे झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्चात बचत होणार आहे. दाºया घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जुन्नरकर नागरिकांनी केली आहे. दाºया घाटाबाबत जुन्नरकर नागरिकांची व्यथा आजही कायम आहे. सध्या सुरू असलेला माळशेज घाटातील वाहतूक पावसाळ्यात मात्र धोकादायक असते. थेट रस्त्यावरच मोठमोठे डोंगरकडे असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.
बाळासाहेब साळवे, अशोक भोजने, संजय नवले, अमोल शिंदे, अनिल मेहेर, हरीश भवाळकर आदी मान्यवरांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांची भेट घेतली.