पुण्यातील जम्बोत तरुणीचा मृत्यू! नातेवाईकांची चक्क गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:53 AM2021-05-13T11:53:50+5:302021-05-13T12:04:03+5:30
रुग्ण सुरुवातीपासूनच गंभीर असल्याचा प्रशासनाचा दावा, तर वॉर्ड बॉयने गैरव्यवहार केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पुणे: पुण्यातल्या जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये २५ वर्षीय बहीणीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका पोलिस कॅान्स्टेबलने चक्क खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे. आपल्या बहीणीशी वॅार्ड बॅायने गैरवर्तणूक केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान मृत व्यक्ती ही दाखल झाली तेव्हा पासूनच गंभीर स्थितीत आणि व्हेंटीलेटर वर होती. त्यांच्या परिस्थितीविषयी नातेवाईकांना आधीच कल्पना देण्यात आली होती. तसेच या नातेवाईकांनी जम्बो च्या वॅार्ड बॅायला मारहाण केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून प्रशासनाकडून देखील नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे.
सीओईपी जम्बो रुग्णालयात एक माहिला उपचारांसाठी गेले काही दिवस दाखल होती. तब्येत बिघडल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या मृत्यू ला जम्बो प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कोल्हापूर मध्ये पोलिस असणाऱ्या बहीणीने याबाबत पोलिस तक्रार दाखल करुन घेण्याचा आग्रह धरला आहे. आपल्या बहीणीशी वॅार्ड बॅायने गैरवर्तणूक केल्याचा आरोप या महिलेच्या भावाने केला आहे.
दरम्यान ही महिला १ तारखेला दाखल झाली तेव्हा पासूनच ती गंभीर होती. याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती असं स्पष्टीकरण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान नातेवाईकांनी वॅार्ड बॅायला मारहाण केली असा दावा करत जम्बो प्रशासनानेही नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस इन्स्पेक्टर निलिमा पवार म्हणाल्या की या प्रकरणात संपुर्ण चौकशी करुन मगच काय कार्यवाही करायची याचा निर्णय घेतला जाईल”