यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. चंद्रकांत कोलते, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीहरी भोसले, रवींद्र कंद, सीताराम बाजारे, हरिभाऊ गायकवाड, शिवाजीमामा खांदवे, सूर्यकांत शिवले, बाळासाहेब ढगे, डोंगरगाव, बुरकेगाव, पेरणे, लोणीकंद, आदी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
कोरोना संकटाने अगोदरच शेतकरी अडचणीत आल्याने शेती व्यवसाय कोलमडला असून अनियमित वीजपुरवठा, वीजेचे चुकीचे रिडींग व बिले, बिले न मिळणे, बिल दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना होणारा त्रास, ट्रांसफार्मर बिघाड, त्यासाठी शेतकऱ्यांना पडणारा भुर्दंड यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यातच मार्चअखेर असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटी कर्ज यांच्या वसुलीचा धडाका चालू आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी यासह गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. आता वीजबिले कशी भरायची ? या आर्थिक विवंचनेत शेतकरी असतानाच ट्रांसफार्मर बंद करणे, वीज तोडणे मंडळाने सुरू केल्याने पिके जळून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महावितरणने प्रत्यक्ष शेतीवर जाऊन वीज बिलांची दुरुस्ती करुन बिल भरण्यासाठीही मुदत द्यावी, तोपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोलते यांनी सांगितले. मात्र मंडळाची अरेरावी अशीच सुरु राहील्यास शेतकऱ्यांना संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
२० लोणीकंद