ढेकळवाडी-भवानीनगर रस्त्याच्या डागडुजीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:31+5:302021-09-12T04:13:31+5:30
ढेकळवाडी येथील गावठाण ते जाचकवस्ती हा रस्ता रहदारीचा असून, साखर कारखाना व इंदापूरकडे जाण्यासाठी तो ...
ढेकळवाडी येथील गावठाण ते जाचकवस्ती हा रस्ता रहदारीचा असून, साखर कारखाना व इंदापूरकडे जाण्यासाठी तो एकमेव रस्ता आहे. त्यामुळे ढेकळवाडीसह वाडी-वस्त्यावरील ग्रामस्थ, विद्यार्थी, साखर कामगार, ऊस वाहतूक वाहने, बैलगाड्या यांची मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी रस्ता खडतर बनला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनीधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ कोटी रुपये या रस्त्यासाठी दिलेले आहेत. परंतु अजूनही काम सुरू नाही. अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने ढेकळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दि. २० रोजी रस्त्यावर प्रतीकात्मक आंदोलन म्हणून चिखलातून गाड्या पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला ३ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या वेळी बाळासो बोरकर, शिवाजी लकडे, सुभाष ठोंबरे, संपतराव टकले, उपसरपंच शुभम ठोंबरे, रामदास पिंगळे, नामदेव ठोंबरे, संजय टकले उपास्थित होते.
ढेकळवाडी-भवानीनगर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देताना ग्रामस्थ.
११०९२०२१-बारामती-०१