चिंचवड स्टेशन, पिंपरी येथील उड्डाण पूल पाडा; रेल्वे विभागाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेस पत्र

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 30, 2024 03:11 PM2024-11-30T15:11:19+5:302024-11-30T15:12:02+5:30

पिंपरी : शहरातील पिंपरी कॅम्प येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल तसेच, चिंचवड स्टेशन येथील पणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावास ...

Demolish the flyover at Chinchwad Station Pimpri Railway Department letter to Pimpri-Chinchwad Municipal Corporation | चिंचवड स्टेशन, पिंपरी येथील उड्डाण पूल पाडा; रेल्वे विभागाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेस पत्र

चिंचवड स्टेशन, पिंपरी येथील उड्डाण पूल पाडा; रेल्वे विभागाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेस पत्र

पिंपरी : शहरातील पिंपरी कॅम्प येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल तसेच, चिंचवड स्टेशन येथील पणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. ते दोन्ही पूल पाडा, असे पत्र रेल्वे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाठविले आहे. त्यामुळे महापालिका हे पूल पाडणार की, नवीन पूल तयार करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे-मुंबई जुन्या महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील उड्डाणपूल हा शहरातील सर्वात पहिला पूल आहे. या इंदिरा गांधी पुलाचे आयुष्य संपले असून, बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल वाहतुकीस बंद करा. पूल पाडून टाका, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रॅक्चर ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे २ ते ३ वर्षे सुरू होते.

तसेच, शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहे. हे दोन्ही पूल महापालिका पाडणार की, नव्याने पुन्हा तयार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलास ४७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुलाचे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. यापूर्वीच पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र आले आहे. त्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही पुलाचे काय करायचे यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

Web Title: Demolish the flyover at Chinchwad Station Pimpri Railway Department letter to Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.