वाल्हेत ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:15 AM2021-09-05T04:15:19+5:302021-09-05T04:15:19+5:30
प्रोजेक्टरच्या साहाय्याने 'ई-पीक पाहणी' ॲप संदर्भातील माहिती दाखवण्यात आली होती. शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी' कार्यक्रमाची माहिती, तसेच ॲप वापरा, संदर्भातील ...
प्रोजेक्टरच्या साहाय्याने 'ई-पीक पाहणी' ॲप संदर्भातील माहिती दाखवण्यात आली होती. शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी' कार्यक्रमाची माहिती, तसेच ॲप वापरा, संदर्भातील माहिती, तसेच शेतक-यांनी शेतामध्ये जाऊन ॲप द्वारे माहिती कशी अपलोड करायची या संदर्भातील माहिती वाल्हे गावचे तलाठी नीलेश अवसरमोल व सहकारी आनंद पवार हे देत आहेत.
भविष्यात नैसर्गिक अपतीचे नुकसान असेल पीक विमा योजनेची भरपाई असेल तसेच कृषी विभागाच्या योजना,पीएम किसान योजना असेल यांच्या लाभासाठी ई-पीक पाहणी कशी करून घ्यायची याची माहिती सर्व शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे. दरम्यान, वाल्हे परिसरातील अंबाजीचीवाडी, सुकलवाडी, आडाचीवाडी येथील शेतकऱ्यांना या ॲप संदर्भातील प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिले.
तसेच वाल्हे परिसरातील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच प्रत्यक्षात शेतात जाऊन ॲप संदर्भातील माहिती, देणार असल्याचे तलाठी नीलेश अवसरमोल यांनी सांगितले. तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून 'ई-पीक पाहणी' करण्याचे आव्हान केले. आडाचीवाडी येथील शेतकरी लक्ष्मण दाते यांच्या शेतामध्ये जाऊन तलाठी नीलेश अवसरमोल व सहकारी आनंद पवार यांनी येथील शेतकरी रोहिदास पवार, दिलीप पवार, अनिल पवार, देविदास पवार, दत्तात्रेय पवार आदी शेतकरी वर्गाला त्यांच्या शेतात 'ई-पीक पाहणी' संदर्भातील माहिती दिली.