डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ

By admin | Published: October 22, 2015 02:47 AM2015-10-22T02:47:39+5:302015-10-22T02:47:39+5:30

आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकरांची लाहीलाही होत असतानाच तापानेही मुंबईकर हैराण झाले आहेत. सात दिवसांत वेगवेगळ्या तापाचे अडीच हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत, तर

Dengue-like patients increase | डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ

डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ

Next

मुंबई : आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकरांची लाहीलाही होत असतानाच तापानेही मुंबईकर हैराण झाले आहेत. सात दिवसांत वेगवेगळ्या तापाचे अडीच हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत, तर डेंग्यूसदृश तापाचे ९७४ रुग्ण आढळून आले आहेत.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या सात दिवसांत डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. हा आकडा वाढता आहे. गेल्या आठवड्यातही या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यातील बहुतांश रुग्णांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. या रुग्णांची लक्षणे डेंग्यूशी साधर्म्य साधणारी होती. मात्र, यांना डेंग्यू झालेला नव्हता.
आॅक्टोबर महिन्यात ३६ ते ३७ अंशांवर तापमान स्थिर राहिल्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सात दिवसांत तापाचे २ हजार ६१० रुग्ण आढळून आले आहेत. तर मलेरियाचे २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. सात दिवसांत स्वाइनचे दोनच रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४० च्या घरात आहे. टायफॉइडचे ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. पाण्यामुळे होणाऱ्या आजारात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६२ वर पोहोचली आहे, तर काविळीचे २९ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)

गर्भवती महिलांना स्वाइनची लस
रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास संसर्गजन्य आजार जडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची लागण होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी गर्भवती महिलांना पालिकेकडून स्वाइन फ्लूची लस देण्यात येते. आतापर्यंत १ हजार ४२६ महिलांना स्वाइनची लस देण्यात आली आहे.

Web Title: Dengue-like patients increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.