वाढती महागाई आणि सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ याविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रवक्ते गौरव जाधव, प्रफुल्ल गुजर, अरविंद तायडे उपस्थित होते.
कुरेशी म्हणाले, की पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. यावर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. राष्ट्रीय स्थूल उत्पन्न (जीडीपी) दर कमालीचा घटला आहे. त्यामुळे देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यात केवळ सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. सामान्य जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरून आवाज उठवणार नाही तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष केवळ महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. काँग्रेस वाढत्या महागाईचे कारण पुढे करून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहेत, असेही ते म्हणाले.