पुणे: पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. यात येथील सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली होती. या अग्नितांडवात कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झालेच पण अन् अनेक छोटे छोटे व्यावसायिक देखील रस्त्यावर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२९) फॅशन स्ट्रीटला भेट दिली. यात या सर्व परिसराचे पुढील तीन दिवसांत मूल्यमापन करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुण्यातील फॅशन स्ट्रीटला अजित पवार हे उद्या (दि.30) मार्च रोजी नियोजित भेट देणार होणार होते. मात्र, सोमवारी सायंकाळी पवार यांनी फॅशन स्ट्रीटला भेट दिली.यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी येत्या शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे सांगितले. फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुण्यात कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संबंध मार्केट आगीत जळून खाक झाले. कॅन्टोन्मेंट, पुुणे, पिंपरी- चिंचवड मनपा, लष्कर विभागाच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर साहाय्याने पहाटे ५ वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र, कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.