अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला; भरसभेत उपमुख्यमंत्र्यांनी काढला तक्रारीवर तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 08:03 PM2022-05-07T20:03:13+5:302022-05-07T20:10:07+5:30

नागरिकानं अजित पवारांसमोर मांडली तक्रार; उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट शब्दांत ताकीद

deputy cm ajit pawar directs deputy sp after listening problem of citizen | अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला; भरसभेत उपमुख्यमंत्र्यांनी काढला तक्रारीवर तोडगा

अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला; भरसभेत उपमुख्यमंत्र्यांनी काढला तक्रारीवर तोडगा

Next

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत.शनिवारी(दि ७) काटेवाडी या त्यांच्याच गावात गावकºयांनी त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडले.उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये नागरिकाच्या तक्रारीवर भर सभेत तोडगा काढला.

एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत आयोजित सभेत एका नागरिकाने जागेची मोजणी म्हणून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नसल्याचे थेट पवार यांनाच सांगितले.त्यामुळे मात्र संतापलेल्या पवार यांनी थेट उपस्थित असलेल्या डिवायएसपींना आदेश दिला. यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पाहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला अशी ताकीद दिली.
त्यानंतर एका ग्रामस्थाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे, पण त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सुचना देत होते. याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मागार्ची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार करत भर घातली.

...ही आपली संस्कृती- परंपरा नाही
बारामतीत आयोजित कार्यक्रमात पवार म्हणाले, कोणाच्याही भावना न दुखवता सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने आपण सर्वजण राहत आलो आहे. न्यायालयाने भोंग्या यासंदर्भात जे नियम घालूनदिले आहेत, त्यानुसार आपल्याला पुढे जावे लागले. मात्र भोंग्यावरून एकमेकांबाबत आकस, गैरसमज, जातिभेद करून चालणार नाही. ही आपली संस्कृती- परंपरा नाही, आपल्याला वडिलधाºयांची हि शिकवण नाही. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करतात आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा राजकारणामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: deputy cm ajit pawar directs deputy sp after listening problem of citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.