वैद्यकीय सेवेबरोबर नेतृत्व गुणांचा विकास करा : बिपीन पुरी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 06:55 PM2018-03-21T18:55:16+5:302018-03-21T19:05:28+5:30

पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाच्या ५२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या दिमाखात लष्करी महाविद्यालयाच्या परेड मैदानावर उत्साहात पार पडला.

Develop leadership qualities with medical services: Bipin puri | वैद्यकीय सेवेबरोबर नेतृत्व गुणांचा विकास करा : बिपीन पुरी :

वैद्यकीय सेवेबरोबर नेतृत्व गुणांचा विकास करा : बिपीन पुरी :

Next
ठळक मुद्दे८९ वैद्यकीय अधिकारी लष्करी सेवेत, ६ जन नौसेनेत आणि विद्यार्थी वायुसेनेत दाखल होणार कलेरिपुटी कवायती आणि नेव्ही बँडचे सादरीकरणआकाशगंगा या स्कायड्राईव्हिंग टीम स्कायड्राईव्हिंग चित्तथरारक प्रात्यक्षिके समुपदेशन केंद्र सुरू, मिलिटरी मेडिसीनमध्ये अधिकाधिक संशोधन करून चांगल्या सुविधा

पुणे : लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाला मोठी परंपरा आहे.भारतीय लष्कर वैद्यकीय सेवा सर्वात मोठी संस्था आहे. सैन्याबरोबरच सामान्य नागरिकांना उत्कृष्ट दर्जाची सेवा पुरवणा-या संस्थेचे तुम्ही आज घटक झाला आहात. वैद्यकीय सेवा देताना तुमच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करा,त्याबरोबरच व्यावसायिक कौशल्यही आत्मसात करा, असे प्रतिपादन भारतीय लष्कर वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी व्यक्त केले. पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाच्या ५२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या दिमाखात लष्करी महाविद्यालयाच्या परेड मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी लष्करी वैद्यकीय विद्यालयाचे कमांडर एअर मार्शल सी. के. रंजन, लष्करी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर तसेच लष्करातील अधिकारी उपस्थित होते. 
पुरी म्हणाले,वैद्यकीय सेवा देताना तुमच्यामधील नेतृत्व गुणांचा विकास होणार आहे. अतिशय प्रतिष्ठित असणा-या सेवेचा तुम्ही भाग आहात. ही सेवा बजावत असताना देशहित डोळ्यासमोर ठेवून चांगली सेवा कशी देता येईल याचा सातत्याने विचार करायला पाहिजे. पालकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला. यामुळे पालकांचे आभार मानतो. वैद्यकीय सेवेचा तुम्ही कणा असल्याने तुमच्या सेवेतून नागरिकांना प्रेरणा मिळायला हवी.लष्करी अधिकारी आणि जवानांता ताण तणावांना सामोरे जावे लागते. त्यांचा ताण तणाव कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी योेगा तसेच समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. जवानांशी बोलून त्यांच्या समस्या समजुन घेत त्यातून मार्ग काढण्यावर भर आहे. तसेच एखादा जवान जखमी झाल्यावर त्याला सर्वप्रथम वैद्यकीय उपचार देणे महत्वाचे असते. यामुळे अशा आघाड्यांवर पूर्ण बटालीयनसाठी डॉक्टर हा देवा सारखा असतो. यामुळे रूग्णांवर उपचारासाठी विविध संशोधन करण्यात येत आहेत. मिलिटरी मेडिसीनमध्ये अधिकाधिक संशोधन करून जवानांना कशा चांगल्या सुविधा देता येईल. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे पुरी म्हणाले.
 
यावर्षी १०३ कॅडेट लष्करी विद्यालयातून एमबीबीएस शाखेत पदवीधर झाले. यामध्ये ८० विद्यार्थी आणि २३ विद्याथीर्नींचा समावेश आहे. यापैकी ८९ वैद्यकीय अधिकारी लष्करी सेवेत, ६ जन नौसेनेत आणि विद्यार्थी वायुसेनेत दाखल होणार आहेत. सार्जंट सब लेफ्टनंट आस गाझि नक्वी याने दीक्षांत सोहळ्याच्या संचलनाचे नैतृत्व केले. यावर्षीच्या प्रसिडेंन्ड गोेल्ड मेडलची मानकरी ही फ्लार्इंग आॅफिसर शैलजा त्रिपाठी ठरली. राष्ट्रपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.तर फ्लार्इंग आॅफिसर हरिष पंत हा कलिंगा करंडकाचा मानकरी ठरला.

चित्तथरारक प्रात्यक्षिके
दीक्षांत सोहळ्याप्रसंगी आग्रा येथील आकाशगंगा या स्कायड्राईव्हिंग टीमच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तब्बल ९ हजार फुटावरून लष्कराच्या एम ५० या विमानातून १० ड्रायव्हर्सनी पॅराशूटच्या साह्याने उडया मारली. त्यात थ्री फॉरमेशन, टू फॉरमेशन करत भारतीय तिरंग्याची आकर्षक प्रतिकृती या डायव्हर्सनी आकाशात तयार केली. या बरोबरच हवेचे आणि वेगावर पॅराशूटच्या साह्याने नियंत्रण मिळवत योेग्य ठिकाणी सर्व डायव्हर्स खाली उतरल्याने उपस्थितांनी टाळ्यांनी त्यांच्या साहसाला दाद दिली. या डायव्हर्सच्या टीमचे नेतृत्व हवाईदलाच्या अकाऊंट विभागातील एका महिलेने केले. 
....................................

कलेरिपुटी कवायती आणि नेव्ही बँडचे सादरीकरण
स्कायड्राईव्हींगच्या प्रात्यक्षिकानंतर कलेरिपटू या भारतीय मार्शल आर्ट क्रीडा  प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. जवानांनी सादर केलेल्या कवायतींना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर नौदलाच्या बँडने विविध गाण्यांच्या ट्यून वाजवत शिस्तबद्ध संचलन केले. 

पाचवी पिढी लष्करात
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून १९८७ ला पासाऊट झालेले कर्नल के. एस. ब्रार यांची पाचवी पिढीही लष्करात दाखल झाली. त्यांचा मुलगा अनिकेतसिंग ब्रार याने लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. घराण्याची परंपरा मुलाने कायम ठेवल्याने वडील भाऊक झाले होते.
-----
टॉपर्स कॅडेट कोट..
आईचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणापासून लष्करात पाठविण्याचेआईचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणापासून लष्करी सेवेचे आकर्षण होते. माझ्या कुटुंबात लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी या क्षेत्रात आले. पाच वषापूर्वी मी एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर एफएमसीमध्ये प्रवेश मिळवत मी माझ्या आईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आणि माझे लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न आज पूर्ण केले आस गाझी नक्वी,  फ्लार्इंग आॅफिसर
-----------------
लष्कराचा गणवेश अभिमानास्पद
लहानपणापासुन डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. तेवढेच लष्कराचे देखील आकर्षण होते. पांढरा कोट घालण्याण्यापेक्षा लष्कराचा गणवेश जास्त अभिमानास्पद आणि गौरवास्पद वाटतो. शैलजा त्रिपाठी, फ्लार्इंग आॅफिसर

Web Title: Develop leadership qualities with medical services: Bipin puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.