डिझेल चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:29+5:302021-06-16T04:14:29+5:30
दत्ता विनोद रणधीर (वय २२), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय २७) , वैभव राजाराम तरंगे (वय १९), ...
दत्ता विनोद रणधीर (वय २२), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय २७) , वैभव राजाराम तरंगे (वय १९), प्रतीक बन्सिलाल तांबे (वय २६, सर्व रा.दत्तवाडी, उरुळी कांचन , ता.हवेली), स्वरूप विजय रायकर ( वय २३, रा. सूर्यवंशीमळा ,अष्टापूर फाटा), धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर ( वय ३४, रा. टिळेकर वाडी ता. हेवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गलगत असणारे हॉटेल, ढाबे, विविध कंपन्यांच्या समोर थांबणाऱ्या माल वाहतुकीच्या ट्रकमधून हजारो रुपयांचे डिझेल चोरीच्या घटना काही महिन्यांपासून सातत्याने घडत होत्या. मात्र पोलिसांकडे त्याच्या तक्रारी येत नसल्याने पोलिसांना त्याचा मागमूस लागत नव्हता.
९ जून रोजी नांदूर येथील एका कंपनीसमोर पार्किंगमधील ५ ट्रकमधून सुमारे ८३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस गेले होते. ११ जून रोजी पारगाव येथील एका ट्रक मधून २५ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस गेले होते. वरील दोन्ही गुन्ह्यांची यवत पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित पथक अशा चोरांच्या मागावर होते. संबंधित गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका विशिष्ट पथकाने तपास सुरू केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या दत्तवाडी येथे सापळा रचून पोलिसांनी सहा जणांना पकडले त्यांनी चोरलेला मोबाईल व त्यांच्याकडील दोन कार असा ४ लाख ९० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस नाईक विजय कांचन, पो. ना. राजू मोमिन, कॉन्स्टेबर अभिजित एकशिंगे, कॉन्स्टेबर अमोल शेंडगे, पो. कॉ. मंगेश भगत, कॉन्स्टेबल धिरज जाधव, कॉन्स्टेबर पूनम गुंड , पो कॉ दगडू विरकर
यांचे पथकाने केली आहे .
--
फोटो क्रमांक : १४यवत पोलीस ठाणे पथक
फोटो ओळी : यवत पोलीस स्टेशन हद्दीत डिझेल चोरणारी टोळी जेरबंद केल्यानंतर समवेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक