पुणे : रक्षाबंधन हा बच्चेकंपनीचा अावडत्या सणांपैकी एक सण. या सणासाठी विविध प्रकारच्या राख्या सध्या बाजारात दाखल झाल्या अाहेत. त्यातही सध्याच्या अाॅनालाईनच्या युगात लहानगे हे माेबाईल अाणि टिव्हीवर अापला जास्त वेळ घालवत असल्याने लहानग्यांसाठी पाेकेमाॅन, सुपनमॅन, स्पायडरमॅनची चित्रे असलेल्या राख्या बाजारात पाहायला मिळत अाहेत. या राख्या सध्या चिमुकल्यांसाठी अाकर्षण ठरत अाहेत. त्याचबराेबर नवनवीन पद्धतीच्या अाकर्षक राख्या खरेदीकरण्यासाठी शनिवारी सगळीकडे गर्दी दिसून येत हाेती.
रविवारी रक्षाबंधन असल्याने शनिवारी सर्व बाजारपेठांमध्ये महिलांनी गर्दी केली हाेती. ग्राहकांना अाकर्षित करण्यासाठी दुकानदार दरवर्षी काहीतरी हटके राख्या विक्रीस ठेवत असतात. त्यात पारंपारिक राख्यांचाही समावेश असताे. पुण्यातील तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे राख्यांचे विविध स्टाॅल मांडण्यात अाले अाहेत. यंदा येरवडा जेल प्रशासनाकडून राखी महाेत्सव राबविण्यात अाला हाेता. यात कैद्यांनी तयार केलेल्या राख्या विक्रीस ठेवल्या हाेत्या. या महाेत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पाेकेमाॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन असे कार्टुन्स लहान मुलांच्या अावडीचे असल्याने या कार्टुन्सच्या राख्या विक्रीस ठेवण्यात अाल्या अाहेत. त्याचबराेबर यंदा चाॅकलेट राख्या हा राख्यांचा अनाेखा प्रकारही बाजारात पाहायला मिळाला.
दरम्यान रक्षाबंधनानिमित्त माेठ्याप्रमाणावर नागरिक गावी जात असल्याने एसटी स्टॅंड तसेच रेल्वे स्थानकात गर्दी झाली हाेती. एसटी प्रशासनाकडून काही मार्गांवर जादा बसेस साेडण्यात अाल्या.